लोकदर्शन 👉 राहुल खरात
आज नाशिक येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी साहित्य संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रासह सातासमुद्रापार पोहोचलेली साहित्यकृती ‘उठा तुम्हीही जिंकणारच’ या वैशाली प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या अशोक कुमावत यांच्या पुस्तकास प्रतिष्ठेचा ‘ रंगकर्मी निळूभाऊ फुले’ वाङ्ममय साहित्य पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित पहिले अखिल भारतीय शेकोटी संमेलन अतिशय उत्साहात भावबंधन मंगल कार्यालय ,पंचवटी नासिक येथे संपन्न झाले. यावेळी आय.ए. एस.ऑफिसर सूर्यवंशी साहेब,संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यीक प्रा.शंकर बोऱ्हाडे,विश्वास रेडिओचे मालक विश्वास ठाकूर,सा.वा. ना.चे सचिव जयप्रकाश जातेगावकर, जेष्ठ अभियंता बाळासाहेब मगर,गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार,प्रा.राज शेळके,रवींद्र मालुंजकर आदी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या साहित्य यात्रेत स्व.कमलाकर आबा देसले साहित्य नगरीत स्व.किशोर पाठक काव्य कट्टा,स्व.सुरेश भट गझल कट्टा,बहिणाबाई अहिराणी कवी कट्टा,स्व.बाबुराव बागुल कथाकथन मंच,साने गुरुजी बालकवी कट्टा,
परिसंवाद,चर्चासत्रे, लोककलेचा जागर,आदिवासी नृत्य,जागरण गोंधळ अशी विविध साहित्याची अनोखी मेजवानी नाशिककरांनी अनुभवली.संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून आलेल्या साहित्यप्रेमींनी नासिक परिसर साहित्याने दुमदुमून निघाला.आदर्श शिक्षक कुमावत यांना या अगोदर जिल्हा,राज्य,आणि देशपातळीवरील अनेक,शासकीय ,सामाजिक,
विविध संस्थांच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.