- #washimBy : Ajay Gayakwad
- वाशिम
कारंजा : राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची संयुक्त जयंती महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने नुकतीच साजरी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला पत्रकार उषाताई नाईक तर प्रमुख अतिथी गजानन अहमदाबादकर, सुधाकर गर्जे, पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले, सत्कारमूर्ती उत्कृष्ट प्रशासक तहसीलदार धीरज मांजरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे होते.
कारंजा शहरातील आणि तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्यांना न्याय देण्यासाठी सतत धडपड करणारे आणि राज्यात कारंजा तहसील ला सन्मान प्राप्त करून देणारे तहसीलदार धीरज मांजरे आणि राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती चा तिसरा क्रमांक मिळविण्यासाठी मुख्य भुमिका असलेले बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांचा पत्रकार संघाचे वतीने शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना तहसीलदार धीरज मांजरे यांनी पत्रकार संघाच्या सत्काराने आपल्यावर अधिक उत्तरदायी प्रशासनाची जबाबदारी आली असून आपण ती अधिक लोकाभिमुख करून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे सांगून तालुक्यातील अनेक प्रश्नाला मार्गी लावण्याचे सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्यात नाही तर विभागात खरेदी आणि पारदर्शी व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे. आणि या कृषी उत्पन्न बाजार समिती मधून शेतकऱ्याचे हिताचे सर्वतोपरी रक्षण करण्याची असलेली जबाबदारी या सत्कारामुळे प्रेरक ठरेल असे मत मांडून पत्रकार संघाचे आभार व्यक्त केले.यावेळी पत्रकार संघाचे सक्रिय सदस्य ज्ञानेश्वर वरघट यांची उपसरपंच पदी नियुक्ती झाल्याने त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी गजानन अहमदाबादकर,सुधाकर गर्जे आदींनी मनोगत व्यक्त करीत महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची कार्य पद्धती बदल प्रसंशा केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोहम्मद मुन्नी वाले यांनी तर आभार पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडुभाऊ इंगोले यांनी मानले.कार्यक्रमाला महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे तालुका कार्यकारणी कोषाध्यक्ष दैनिक भास्कर चे विशेष प्रतिनिधी प्रा सी पी शेकूवाले,उपाध्यक्ष प्रा.डॉ.दिनेश रघुवंशी,सचिव गालिब पटेल,जिल्हा कार्यकारणी सदस्य कालूभाई तवंगड,साप्ताहिक कारंजा स्वाभिमान चे संपादक सलीम खान ,स्वराज टी व्हीं चे जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार ,गावाकडची बातमी चे जिल्हा प्रतिनिधी दामोदर जोधडेकर ,दैनिक सम्राट चे तालुका प्रतिनिधी डीगंबर सोनोने, एम. डी.मुंनिवाले,विनोद गणवीर ,शरद कुऱ्हे,साप्ताहिक वाशीम इन्साफ चे संपादक अतिक खान,abन्यूजचे प्रतिनिधी राऊत,दिलीप पाटील इंगोले, मयूर राऊत,,संदीप कुर्रे.. सौ.उषा नाईक ,ज्ञानेश्वर वरघट,दादाराव बहूटे आदींची उपस्थिती होती.