लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी
वालुर येथील स्व. नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मिकेश्र्वर माध्यमिक विद्यालयात स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.डि..भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डि.आर.नाईकनवरे, एम.एस.गिरी ,विद्यार्थी प्रतिनिधी कोमल जाधव, सितल पवार तर राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या वेशभुषेत शारदा गिरी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीनी.भाषणे केली. तसेच राष्ट्रमाता जिजाबाई यांच्या वेशभुषेत असलेली शारदा गिरी हिने राष्ट्रमाता यांच्या जिवनचारीत्र्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कोमल जाधव,सितल पवार यांनी मनोगत व्यक्त केले. एम.एस.गिरी, डि.आर. नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोनु सोनवणे, अंजली कटारे यांनी केले तर आभार सहशिक्षक डि.आर.नाईकनवरे यांनी मानले.