डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण

By : Shankar Tadas

नागपूर : टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित होऊ घातलेल्या देवनाथ गंडाटे लिखित “डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

नागपुरातील वनामती सभागृहात आयोजित छोटेखाणी कार्यक्रमात डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीव्हन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, तरुण भारत डिजिटलचे संपादक शैलेश पांडे, उच्च न्यायालयाचे एडवोकेट आनंद देशपांडे, डॉ. कल्याणकुमार, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर उपस्थित होते. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया माध्यमातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकातून माहिती व तंत्रज्ञानाची सुलभतेने ओळख होईल, अशा शुभेच्छा राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिल्या. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनीही कौतुक केले.

यावेळी ‘लोकदर्शन’ पोर्टलचे संपादक शंकर तडस यांच्यासह विदर्भातून विविध जिल्ह्यातून आलेल्या डिजिटल मीडिया प्रतिनिधींची उपस्थिती होती. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे टेक्नोविजन मीडिया ॲण्ड कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद आंबेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here