लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 7 जानेवारी ठाकुर्ली ग्रामस्थ मंडळ डोंबीवली यांच्या तर्फे भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण डोंबीवली भिवंडी या आगरी कोळी ओबीसी बहुल् ठाणे पालघर मुंबई, रायगड जिल्हयातील शेत जमिनी विकासाच्या नावाने कधी सरकारने तर कधी खाजगी बिल्डर लॉबीने कवडीमोड भावाने खरेदी केल्या आज जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. परंतु या वाढत्या किंमतीचा फायदा येथील भूमीपुत्र आगरी कोळी बांधवांना कधीच झाला नाही. महसूल प्रशासनातील उच्च वर्णीय शेठजी भटजी प्रशासक आणि राजकीय नेते पक्ष, पोलिस, बिल्डर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा विडा उचललेला दिसत आहे. मुंबईतील कोळीवाडे, मुंबई महानगर पालिका एस आर.ए, क्लस्टर, नवी मुंबई सिडको, नैना विमानतळ प्रकल्पासाठी उध्वस्त होत आहेत . या सर्व संकटात भूमिपुत्र आगरी समाज लढण्या साठी उभा राहतो तेव्हा राजेश नाना भोईर यांचासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर स्वामीनारायण बिल्डर म्हणजेच गुजराती पटेल लॉबी कडून खोट्या खंडणीच्या केसेस दाखल होतात. हाच प्रकार उसाटणे , हेदूटणे या आगरी गावठाणात लोंढा बिल्डरकडून सुरू आहे. या अत्याचारात गावठाणे आणि गावकरी सुरक्षित राहावेत यासाठी समस्त आगरी कोळी कराडी ओबीसी समाज बांधवांची जाहिर ग्रामसभा ठाकुर्ली डोंबीवली टेकडीच्या खाली,स्वामीनारायण ऑफिससमोर रेती बंदर रोड डोंबीवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. सोमवार दि 9 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणाऱ्या या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद जाधव, बाळू भोईर,शरद नाना भोईर, मार्गदर्शक वक्ते राजाराम पाटील (उरण रायगड) हे उपस्थित राहणार असल्याचे संयोजक आयोजक राजेश नाना भोईर यांनी कळविले.भूमिपुत्रांचे गावठाण आणि घरांचे प्रापर्टी कार्ड जमीन मालकी हक्कांसाठी सर्वानी एकत्र यावे असे आवाहन उसाटणे हेदुटणे मंडळ आणि समस्त आगरी कोळी कराडी समाज बांधवातर्फे करण्यात आले आहे.