—————————————
लोकदर्शन उस्मानाबाद 👉राहुल खरात
दि.२
उस्मानाबाद शहरातील गणेशनगर, येथील राष्ट्रीयकृत यूको बँकेच्या शाखेत, दि.६जानेवारी रोजी सायंकाळी “यूको”बँकेचा ८०वा वर्धापन दिन निवडक ग्राहकांच्या उपस्थितीत उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद व सहाय्यक मॅनेंजर रविकिरण टेळे यांनी केक कापून वर्धापन दिन साजरा केला.
यावेळी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद म्हणाले की,आमची यूको बँक ही राष्ट्रीयकृत बँक असून तिचे मुख्यालय प.बंगाल येथे आहे आज या बँकेचा ८०वा वर्धापन दिन आपल्या उस्मानाबादच्या शाखेत साजरा करत आहोत. या शाखेने चालू आर्थिक वर्षात चांगला व्यावसाय केला आहे या निमित्ताने उस्मानाबाद परिसरातील अनेक ग्राहाकाशी आंम्ही जोडले गेलो आहोत..आंम्ही आमच्या बँकेच्या ग्राहाकाशी बांधील असून मी व आमचा स्टाफ आमच्या ग्राहाकांना चांगल्या सुविधा देण्याचे काम करत आहोत.ग्राहाकांच्या सहकार्यामुळेच आंम्ही चांगले काम करत आहोत.
याप्रसंगी स.मँनेंजर रविकिरण टेळे म्हणाले की,आमच्या बँकेच्या सिस्टीममध्ये व नियमामध्ये ग्राहाकाचे काम बसले की लागलीच आम्ही होल लोन ग्राहाकाला देतो त्याला जादा हेलपाटे मारायची गरज नाही.उस्मानाबाद मधील ग्राहाकांचा आंम्ही विश्वास प्राप्त केला आहे.याप्रसंगी प्रा.राजा जगताप यांनी मँनेजर ए.आर.अहमद व स.मॅनेंजर रविकीरण टेळे यांचा “तिचे पञ”पुस्तक व बुके देऊन सत्कार केला.
यावेळी यूको बँकेचा ग्राहाक म्हणून बोलताना प्रा.राजा जगताप म्हणाले की,यूको बँकेतील मॅनेंजर ए.आर.अहमद व सहाय्यक मॅनेंजर व त्यांची टिम अतीषय चांगले काम करतात व ग्राहाकाला चांगल्या सुविधा देतात व या बँकेची गृहकर्ज योजना सुलभ असून कागदपञे व्यवस्थित असल्यास लागलीच गृहकर्ज मिळते इतर बँका ग्राहाकाला व्यवस्थित वागणूक देत नाहित टाळाटाळ करतात परंतु यूको बँकेत कसलीही टाळाटाळ केली जात नाही.
यावेळी बँकेच्या निवडक ग्राहाकांनी बँक मॅनेंजर ए.आर.अहमद व स्टाफचा बुके देऊन सत्कार केला. बँकेच्या कर्मचा—यावर विश्वास व्यक्त केला.यावेळी बँकेतील अशोकराजा व सर्व कर्मचारी व ग्राहाक मोठ्या संख्येने उपस्थित होते.