By : Ajay Gayakwad
वाशिम
मालेगाव:
पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचा गोफ, अंगठी आदी एक लाख साठ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक 5 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान शहरातील नागरतास मार्ग जवळील खंडेश्वर केक कॅफे जवळ घडली. याबाबतची फिर्याद जोगेश्वर केशवराव कारेमोरे व 73 वर्ष रा.पाण्याच्या टाकीजवळ मालेगाव यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी हे बँकेत पैसे भरून घरी परत येत असताना पाठीमागून कोणीतरी आवाज देऊन थांबवले तेव्हा फिर्यादीने त्याच्या घरासमोर स्कुटी उभी करून उभे राहिले तेव्हा एक इसम मोटरसायकलवर खरेदी जवळ आला व म्हणाला तुम्हाला मनापासून आवाज देत आहोत तुम्ही थांबले काही नाही मी पोलीस आहे साहेब मागे चौकात उभे आहेत ते बघत आहेत आम्ही चेकिंग करीत असून सदरीस्मानी फिर्यादीच्या हातातील सोन्याची अंगठी दहा ग्रॅम किंमत चाळीस हजार रुपये तीस ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत एक लाख वीस हजार रुपये व पैशाचे पाकीट घेऊन रुमाला टाकला व गाठ बांधून हात चलाखी करीत फिर्यादीच्या हातामध्ये रुमाल दिला व निघून गेला यातील नमूद फिर्यादी जोगेश्वर केशव कारेमोरे ने रुमाल उघडताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत तात्काळ मालेगाव पोलीस स्टेशन गाठून सदर हकीकत सांगितली यावरून अज्ञात आरोपी विरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशनलाअप क्रमांक १/२०२३ कलम ४२० 170 34 भा द वी नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी गव्हाणे हे करीत आहेत.