By : Shankar Tadas
वनसडी :
कोरपना तालुक्यातील जामगाव येथील एका नव वर्षीय मुलाला 25 डिसेंबर रोजी बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ने सदर बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरे लावले. CCTV च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. 4 जानेवारी रोजी सकाळी पिपर्डा जवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तालुक्यात रोही, हरीण, डुक्कर यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रखवालीसाठी शेतात जावे लागते. मात्र बिबट्याचा वावर दिसून आल्याने प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते.