लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– विहीरगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हायस्कूल आणि अंबुजा फाउन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि जयंती निमित्ताने लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांच्या 192 जयंतीचे औचित्य साधून विहीरगाव ग्रामपंचायतचे कार्यालय, जि प. हायस्कूल विहीरगाव येथे ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले, विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.
या प्रसंगी विहीरगावचे सरपंच अँड. रामभाऊ देवईकर, मुख्याध्यापक तथा गटशिक्षणाधिकारी शंकर सर, उपसरपंच निलकंठ खेडेकर, पालक समितीचे अध्यक्ष परशुराम वाघमारे उपाध्यक्ष विनायक खेडकर, मेश्राम सर, शेख सर, निल सर, राहुल सातपुते, पोटे मॅडम, कुचनकर मॅडम, गावंडे मॅडम, ग्रामसेवक भुजंगराव सुर्यवंशी, अंबुजा फाउंडेशनचे प्रदिप वासाडे, भोयर, कृषी सहायक प्रदीप कडभाने, शालिक इंगोले, विजय साळवे, नरेंद्र होरे, सोमेश्वर शेंडे, रुपेश धुडसे यासह जि प शाळेचे सर्व विद्यार्थ्यी आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.