By : Shankar Tadas
चंद्रपूर :
गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे मुख्य संघटक उद्धव पुरी यांनी राज्यातील विविध प्रलंबित तालुका निर्मितीचा निर्णय राज्य शासनाने लवकर निर्णय घ्यावा या साठी राज्यस्तरीय कृती समिती स्थापण्याचा व त्या द्वारे पाठपुरावा करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पनेतून गडचांदूर तालुका संघर्ष समितीचे संघटक सचिव अशोककुमार उमरे हे पुणे येथून 30 डिसेंबर 2022 पासून पुढील चार महिन्यात राज्यभर पायी दौरा करणार आहेत.
या वेळी महाराष्ट्र राज्यातील विविध तालुका निर्मितीचा प्रलंबित निर्णय शासनाने त्वरित घ्यावा या साठी राज्यातील प्रस्तावित तालुकास्थळी संघर्ष करणाऱ्या पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन राज्यस्तरीय तालुका निर्मिती समन्वय समिती स्थापना करून संघटन मजबूत करणे व राज्य सरकारला पाठपुरावा करून विविध शहरांना तालुक्याचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक प्रस्तावित तालुका क्षेत्रातील संबंधीत लोकप्रतिनिधी यांची सुद्धा भेट घेण्यात येणार आहे.
तालुका निर्मिती च्या दृष्टीने आज पर्यंत केलेल्या आंदोलनापेक्षा हे एक अनोखे आंदोलन ची सुरुवात आहे.
गडचांदूर तालुका संघर्ष समिती चे मुख्य संघटक उद्धव पुरी, अध्यक्ष तुळशीराम जी भोजेकर, डॉ. किसनराव भोयर, डॉ. चरण दास मेश्राम, शंकर तडस, मारोती जुमनाके, शशिकांत चन्ने, चुने टेलर, मधुकर चुनारकर , गौतम भसारकर इत्यादींसह संघर्ष समिती सदस्य व सहकाऱ्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
आज पुणे येथून या लॉंग मार्च ची सुरुवात झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधाना नुसार स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मूळ हेतूपासून सर्व राजकीय पक्ष यांना विसर पडला असून त्याबाबत जनजागृती करणे हा सुद्धा अशोक कुमार उमरे यांचा मुख्य उद्देश आहे. त्यांच्या सोबतीला अमरावती चे श्री लांजेकर व पुणे येथील भन्तेजी व इतर सहकारी या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहेत.
येत्या सहा महिन्यांत पुणे किंवा मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्ह्यातील संघटनेचे एक दिवसीय मोठे अधिवेशन घेऊन त्यानंतर सामूहिक रित्या तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे..