लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 28 उरण तालुक्यातील प्राथमिक शाळा भेंडखळच्या मुख्याध्यापिका शारदा संतोष म्हात्रे या आपल्या 34 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून 31 डिसेंबर 2022 रोजी सेवा निवृत्त होत आहेत. उरण तालुक्यातील केंद्र जसखारच्या वतीने दि.28 डिसेंबर रोजी प्राथमिक शाळा भेंडखळच्या सभागृहात शारदा म्हात्रे यांच्या सेवापूर्ती कूतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शारदा म्हात्रे यांनी सुरुवातीला प्रतिकूल परिस्थितीत पेण तालुक्यातील कासु – मोरा, बेडे या चारी बाजूनी समुद्रखाडी असलेल्या आणि कोणत्याही प्रकाची सुविधा नसलेल्या एका सध्या घराच्या खोलीत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले आहे.त्यानंतर उरण तालुक्यातील विंधणे – नवापाडा, गोवठणे, सोनारी व शेवटच्या कालखंडात भेंडखळ येथे मुख्याध्यापिका पदावर शिक्षण सेवा केली आहेत.
यावेळी समाजातील अनेक खेड्यातील मायाळू व्यक्तींशी ऋणानुबंध आले. अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या असलेल्या प्रार्थमिक शाळेतील मुख्याध्यापिका शारदा म्हात्रे यांनी
अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी घडविले आहेत. माणुसकीचे नाते जपणाऱ्या शारदा म्हात्रे यांनी अखेरपर्यंतच्या शिक्षण सेवेत विद्यार्थ्यांसह शिक्षक सहकाऱ्यांसाठी वेळोवेळी सहकार्याची भूमिका बजावली आहेत. आत्ता सेवा निवृत्ती नंतर या भेंडखळ प्राथमिक शाळेवर अवघे दोन शिक्षक पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उरले असून, त्यांनाच या विद्यार्थ्यांना सांभाळून घ्यावे लागणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रियांका पाटील, जसखार केंद्र प्रमुख पी.पी.म्हात्रे, निवृत्त मुख्याध्यापक यशवंत पाटील,गणेश ठाकूर ,फुंडे शाळा मुख्याध्यापक उमेश म्हात्रे, पागोटे शाळा मुख्याध्यापक संजय केणी,वेश्वी शाळा मुख्याध्यापिका रंजना केणी,आदर्श शिक्षक कौशिक ठाकूर, उल्हास केणी आदी मान्यवरांनी निवृत्त मुख्याध्यापिका शारदा संतोष म्हात्रे यांच्या शालेय सेवेतील आठवणींना उजाळा दिला.यावेळी निवृत्त शिक्षक रा.का. म्हात्रे , यशवंत गावंड, संतोष म्हात्रे,अनंत नारंगीकर केशव गावंड ,किरण म्हात्रे,जयश्री गावंड ,चैताली म्हात्रे, शिक्षक महेश गावंड, विकास पाटील, अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.