,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोली (खुर्द)येथे राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून गणित संकल्पना सोप्या पद्धतीने करून शिकवण्याचा प्रयत्न गणित शिक्षक राजेश पवार व वनपाल सोयाम यांनी राजुरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री भिंगारदेवें यांच्या मार्गदर्शनाखाली 22 डिसेंबर ला कृति युक्त शिक्षण या तत्वावर गणिताची भीती कमी करण्यासाठी आणी तणावमुक्त अभ्यासासाठी साध्या व सोप्या पद्धतीने माझी कमाई माझी मिळकत ,माझे गणित माझ्या गणित कल्पना या भूमिकेतून गणित बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
जत्रेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी मनोज गौरकार यांच्या हस्ते शिक्षण विस्तार अधिकारी हेडाऊ,व परचाके,प्रा उमेश राजूरकर, प्रा रोशन मेश्राम यांच्या उपस्थित करण्यात आले .
सर्व पाहुण्यांचे स्वागत लेझीम ढोल ताशा च्या गजरा मध्ये विद्यार्थ्यांनी केले.याप्रसंगी सरपंच सौ अनुसया उदे,उपसरपंच गणेश नैताम,पोलीस पाटील चटप,तंटामुक्ती चे अध्यक्ष रामटेके,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दिनेश आदे,मुख्याध्यापक जी व्ही पवार व इतर उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये गणित विषयाला अग्रस्थान असल्याने विषयाची गोडी व भयमुक्त कृती वर आधारित व आनंददायी पद्धतीने अध्यापन व्हावे यासाठी खेळ आधारित अध्यापन शास्त्र ,गणितीय खेळ,गणित कोंडी ,दैनंदिन व्यावहारिक गणित ,कुटप्रश्न,भौमितिक आकार बौद्धिक कोंडी,विविध शैक्षणिक गणित साहित्य,म्हणी,कविता ,रांगोळी,तोरण, पताके,विद्यार्थ्यांनी तयार केले.
या जत्रेत वर्ग 1 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी गणित साहित्य चे 52 स्टॉल लावले होते.विद्यार्थ्यांनी घरी तयार केलेल्या खाद्य पदार्थ ची विक्री करून कमाई सुद्धा केली.गणित जत्रेचे परीक्षण प्रा उमेश राजूरकर व प्रा रोशन मेश्राम यांनी केले.
उपस्थित सर्व पाहुण्यांनी गणित जत्रेचे कौतुक केले व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.या गणित जत्रेत विद्यार्थी, शिक्षक, पालक,गावकऱ्यांनी उपस्थिती लावली,