लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर-(का.प्र.)येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्भूमीवर 20 डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ, मुंबई तर्फे माजी शिक्षक आमदार व्ही.यु.डायगव्हाणे (अध्यक्ष, म.रा.शि.म.मुंबई ) यांचे नेतृत्वात राज्यातील इतर शिक्षक संघटना सोबत विदर्भातील बलाढ्य शिक्षक संघटना म्हणून दबदबा असलेली विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा संघटना पुर्ण ताकदीने या धरणे/ निदर्शने आंदोलनात सहभागी होत आहे. विधीमंडळ परिसर, यशवंत स्टेडियम, नागपुर येथे 20 डिसेंबरला सकाळी 11 ते 4 या कालावधीत धरणे/ निदर्शने आंदोलन होत आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक , शिक्षकेत्तर काचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागु करणे, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना टप्याटप्याने, अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करुन आवश्यक निधीची तरतूद करणे, रिक्त असलेली माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे तात्काळ भरणे या व इतर प्रलंबित मागण्या व समस्यांच्या पुर्ततेसाठी हे धरणे/ निदर्शने आंदोलन माजी शिक्षक आमदार म.रा.मा.शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष, लढवय्ये नेते व्ही.यु.डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात संपन्न होत आहे. या धरणे/ निदर्शने आंदोलनात वीमाशी संघाचे प्रांतीय पदाधिकारी, सर्व जिल्हायातील जिल्हा व तालुका पदाधिकारी सहभागी होत आहे. अशी माहिती प्रांतीय अध्यक्ष श्रावणजी बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी दिली आहे. तेव्हा चंद्रपूर जिल्हयातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठया संख्येनी यशवंत स्टेडियम, नागपूर येथे 20 डिसेंबर 2022 सकाळी 11ः00 वाजता उपस्थित असावे असे आवाहन महामंडळाचे सहकार्यवाह जगदीश जुनगरी, जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेडे, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव धोबे, कोष्याध्यक्ष दिगांबर कुरेकर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रभाकर पारखी तथा जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी केले आहे.
सुधाकर अडबाले
सरकार्यवाह
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
दिनांकः17/12/2022
स्थळःचंद्रपूर