लोकदर्शन 👉 मोहन भारती
गोंडपीपरी :– एखाद्या शैक्षणिक संस्थेने यशस्वीपणे दीर्घ काळ सेवा कार्य करीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम पार पाडणे आव्हानात्मक असते. यात संस्थेचे संस्थापक, संचालक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा सर्व घटकांचे योगदान असते. संस्थेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्याग, परिश्रम, शिस्त अशा अनेक सकारात्मक गुणांची आवश्यकता आहे असे मत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.
ते संजो कॉन्व्हेन्ट गोंडपिपरी च्या २६ व्या वर्धापनदिन सोहळ्यात उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करीत असताना बोलत होते. या प्रसंगी तहसीलदार के. डी मेश्राम, पोलीस निरीक्षक जिवन राजगुरू, गटविकास अधिकारी माऊलीकर, सभापती सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, नगराध्यक्ष सविता कुळमेथे, कार्याध्यक्ष निलेश संगमवर, वनिता वाघाडे, राकेश पून, चेतन गौर, पाईस मेथिव, प्रिन्सिपल सिस्टर टेंसी, संचालिका सुवर्णमाला भसारकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.