लोकदर्शन मुंबई.👉गुरुनाथ तिरपणकर)-
गेली १२वर्षे झाली,अजुनही मुंबई-गोवा महामार्ग अतिशय संथ गतीने मार्गक्रमण करत आहे.पण समृद्धी महामार्ग४ वर्षात पुर्ण होतो.हा विरोधाभास का?असा प्रश्न मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीला पडला आहे.हा राज्य सरकाचा भेदभाव का.की कोकणातील लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गचे काम ९०टक्के पुर्ण होत असताना रायगड-रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग का पुर्ण होत नाही,हा चर्चेचा विषय ठरत आहे.बरेच अपघात झाले,लोकांचे बळी गेले,तरीही येथील लोकप्रतिनिधींनीचे व सरकारचे डोळे उघडले नाहीत.यालाच वाचा फोडण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती(रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)मैदानात उतरली आहे.नुकताच समितीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत मार्चनंतर शासनाच्या विरोधात शिमगा केला जाईल,एल्गार पुकारला जाईल.महामार्गासाठी कोकणवासियांच्या काही मागण्या घेऊन समिती मैदानात उतरली आहे.खराब रस्त्यांमुळे ब-याच प्रवाशांचा मृत्यू झाला,काहींना कायमच अपंगत्व आल.मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी,आणि आर्थिक मदत शासनाच्यावतीने केली जावी अशी मागणी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे(रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)अध्यक्ष श्रीधर कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.मुंबई-गोवा महामार्गाचा पहीला ८४कीमीचा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन तयार करण्यात येणार आहे.उर्वरित महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन बांधण्यात येणार आहे,असे समितीचे मुख्य प्रवक्ते अॅड.ओवेस पेचकर यांनी सांगितले.माहामार्गावरिल त्रासाबाबत नोकरदार वर्गामध्ये जनजागृती करण्यासाठी सिएसटी व चर्चगेट स्थानकातुन सह्यांची मोहीम राबवण्यात येईल,असे मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे अध्यक्ष श्रीधर कदम यांनी सांगितले.राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या १२वर्षात उपभोगली आहे,याकाळात मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आलेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे.मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने(रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग)आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रायगडकर,रत्नागिरीकर,सिंधुदुर्गकर कोकणवासिय उपस्थित होते.काही कोकणवासियांनी आपली मनोगत व्यक्त केले.यावेळी पत्रकार व ब-याच कोकणवासियांची उपस्थिती होती.