लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
दि 3 किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड डिस्ट्रिक्ट रेफ्री सेमिनार 2022 मोठया उत्साहात संपन्न झाला तसेच जिल्हा स्तरीय पंच परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये रिंग आणि ततामीचे नियम समजविण्यात आले हे सेमिनार शिवसृष्टी अपार्टमेंट,कोतवाल नगर,कर्जत येथे पार पडले.यावेळेस किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष सुधाकरभाऊ घारे,कार्याध्यक्ष मधुकरभाऊ घारे, जीवन ढाकवळ सहसचिव, सतीश राजहंस ( ततामी टेक्निकल चेअरमन आणि इंटरनॅशनल रेफ्री ),
कु.शिवानी राजहंस ( नॅशनल रेफ्री ),संदीप आगीवले, विवेक गायकवाड ( उपाध्यक्ष),सौरभ नवले हेड कोच व कर्जत तालुका किकबॉक्सिंग कार्यकारणी भगवान शिंदे अध्यक्ष,बंडू तुर्डे, अनिल देशमुख, रविंद्र घारे, भगवान पाटील, महेश मिसाळ,राजू कोळी ,महेंद्र कोळी , गोपाल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात होणाऱ्या शालेय स्पर्धांसाठी रायगडने एक पाऊल पूढे टाकले आहे.रायगड मधील खेळाडूंना येणाऱ्या काळात स्पोर्ट्स कोटा आणि नोकरी करिता क्रीडा गुणांची संधी मिळावी आणि रायगड मधून नवनिर्वाचित रेफ्री तयार व्हावे हा या सेमिनारचा उद्देश होता. इंटरनॅशनल
ऑलिम्पिक कमिटीने किकबॉक्सिंग या खेळाला मान्यता दिली आहे,तसेच शालेय स्पर्धा आणि पोलीस स्पर्धांमध्ये किकबॉक्सिंगचा समावेश झाल्याने किकबॉक्सिंगच्या खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सारंगी शैलेंद्र गोळे,गिरीश प्रेमानंद नाईक,
संम्यक किरण गायकवाड,
मानसी किशोर भोईर,कल्पेश प्रकाश पोतदार,यश हेमंत भोज, कृष्णा पाटील,आनंद खारकर, महेंद्र कोळी, राजेश कोळी, निकिता कोळी शीतल गणेशकर विघ्नेश कोळी, राकेश म्हात्रे, भूषण म्हात्रे,परेश पावसकर,अनिश पाटील,रोहित घरत, अमिता घरत, अमिषा घरत, सुजित पाटील, मानसी ठाकूर, विनया पाटील, शुभम ठाकूर यांनी किकबॉक्सिंग च्या पंच परिक्षा दिल्या.