पोलीस भरती विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 4.डिसेंबर 2022एकलव्य करियर ॲकॅडमी उरण व विजय विकास सामाजिक संस्था उरण यांच्या वतीने उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जेएनपीटी टाउनशीप, उरण येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबीराचे प्रास्तविक एकलव्य ॲकॅडमीचे संस्थापक राम चौहान यांनी केले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पोलिस भरती संदर्भात मार्गदर्शन करतेवेळी थेरी आणि मैदानी तयारी तसेच अभ्यासक्रमातील अनेक बारकावे, पद्धती , अंकगणितातील टॅक्टटिज समजवून सांगीतल्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याकरिता नक्कीच मदत झाली.तसेच या कार्यक्रमा मध्ये उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार उपस्थित होते. त्यांनी मुलांना आपल्या आईवडिलांच्या कृपाछत्राखाली संपूर्ण मिळत असलेले सहकार्य विचारात घेऊन फक्त दोन महिने उद्दिष्ट प्राप्तीसाठी असताना सातत्यपूर्ण प्रचंड मेहनत घेतली तर पुढील 40 ते 50 वर्षे आपले जीवन सुरक्षित कसे होईल हे सांगत असताना मा. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गरुड झेप स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिके बाबत तसेच ऑनलाईन ॲप बाबतची माहिती दिली.या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, विकास भोईर उपस्थित होते.
यावेळी ॲकॅडमीच्या माध्यमातून ज्यांनी उद्दिष्ट साध्य केले आहेत असे 4 पीएसआय 19 पोलिस काॅन्स्टेबल यांनी यश संपादन केले आहे त्यापैकी जे उपस्थित होते त्यांना तसेच या ॲकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर मनापासून मेहनत घेणारे राम चौहान यांना तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते सुधाकर पाटील लिखित झुंज क्रांतीविरांची हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here