,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा अशोक डोईफोडे/
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन नेहमी आपल्या कार्यात तत्पर असते मुलांच्या शिक्षणाला महत्त्व देत असते. संगणक प्रशिक्षणाकडे लक्ष देत एकूण १०० मुलांना शिक्षणासाठी आधार देत मोहर्स कम्प्युटर, नांदा फाटा या ठिकाणी मे महिन्यापासून प्रशिक्षण चालविण्यात आले या प्रशिक्षणात १०० मुलांनी यश संपादन केलेतम. त्या मुळे त्यांचे मनोबल वाढावेत व पुन्हा नजीकच्या गावातील मुलांनी या प्रशिक्षणास प्रवेश घ्यावा याकडे लक्ष देत यश संपादन केलेल्या मुलांना अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन द्वारा सन्मानित करण्यात आले. तसेच शिवण वर्गाच्या ३० मुलींना सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आले.
या कार्यक्रमाला अल्ट्राटेक चे युनिट हेड, श्रीराम पी. एस., फंक्शन हेड, गौतम शर्मा, सौदीप घोष व कर्नल दिपक डे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष, गौतम शर्मा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाप्रसंगी युनिट हेड यांनी बोलताना म्हटले की, संगणकाचे ज्ञान हे काळाची गरज आहे व प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य दिले जाते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे तसेच मोहर्ष काम्प्युटर, नांदा चे शिक्षक गणेश पिंपळकर व शिवणकला वर्ग शिक्षिका अंजली उपाध्येय यांचे सुद्धा सहकार्य लाभले.