लोकदर्शन पुणे ;👉 स्नेहा मडावी
चित्रपटाची आवड आणि अभिनय कौशल्यता अंगी असल्यास स्वप्न नगरीची दुनिया आपल्या पासून जास्त दूर असू शकत नाही .
याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री स्वाती सुरेंद्र गायकवाड
तस् त्यांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील चिखली लहानपणा पासूनच त्यांना अभिनयाची आवड आणि ही त्यांची आवड जोपासली त्याचे वडील श्री महादेव क्ष्रीरसाठ यांनी
शाळा महाविद्यालयात त्यांना अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास त्यांनी अनुमती दिली
पण लग्ना नंतर त्यांच्या अभिनयातील कला गुणांना खरे स्वरूप प्राप्त झाले
कारण त्यांच्या या कला गुणांना पती श्री सुरेंद्र गायकवाड यांनी हेरले होते
आता गरज होती ती योग्य संधीची
आणि ती चालून आली
झांगडू या मराठी चित्रपटातून
चित्रपटातील नायिकेच्या आई ची भूमिका ही त्यातल्या त्यात खूप मोठी व तेवढीच महत्त्वाची म्हणून चित्रपटाचे निर्माता श्री योगेश ढोकणे व दिग्दर्शक देवा वाघ हे चांगल्या चरित्र नायिकेच्या शोधात होते
आणि त्याचां हा शोध स्वाती सुरेंद्र गायकवाड यांच्या कडे येऊन थांबला
आणि त्यांना ही भूमिका मिळाली
आपल्यातील अभिनय कौशल्य आणि तेवढीच पतीची खंबीर साथ या जोरावर स्वाती सुरेंद्र गायकवाड यांनी त्या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला
आणि त्या भूमिकेला पूर्ण न्याय मिळवून दिला
सर्व बाजूंनी त्यांच्या भूमिकेची स्तुती होत असताना त्यांनी मात्र याचे संपूर्ण श्रेय पती श्री सुरेंद्र गायकवाड यांना दिले
सध्या ते पुणे येथील उरली कांचन येथे राहतात त्यांनी भूमिका केलेला झांगडू हा चित्रपट येत्या 2 डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदर्शित होत आहे
चित्रपटाचे निर्माते
श्री योगेश ढोकणे आहे
मूळ कथा श्री रंगनाथ आव्हाड यांची असून दिग्दर्शना बरोबर संकलनाची जवाबदारी
श्री देवा वाघ यांनी सांभाळली आहे
चित्रपटाची पटकथा श्री योगेश ढोकणे यांनी लिहिली असून
संवाद श्री रणजित लहारे यांनी लिहिले आहे
चित्रपटात महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील कलाकारांनी आपले योगदान दिले आहे
तरी सर्वांनी सहकुटुंब सह परिवार झांगडू चित्रपट पाहावा