लोकदर्शन 👉(विठ्ठल ममताबादे )
उरण दि २ नोबवरान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस तथा उरणच्या कन्या भावनाताई घाणेकर यांनी सोशल मीडिया द्वारे एक पोस्ट करून तरुणांना राजकीय मतभेद न पाळता राजकारणातून समाजसेवा करण्याचा संदेश दिला आहे.राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचे निकटवर्तीय व जणमाणसात प्रसिद्ध असलेले भावनाताई घाणेकर या धडाडीच्या महिला पदाधिकारी आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे.
तरुणांचा राजकारनात वाढती संख्या लक्षात घेता भावना घाणेकर म्हणतात की
उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यासाठी आज दि. १ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत, ते नक्कीच विजयी होतील याची मला खात्री आहे.
यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, उरण नगरपालिका, तहसील कार्यालय आणि पंचायत समिती अशा तीन ठिकाणी अर्ज भरले जात होते. या तीनही ठिकाणी तरुण उमेदवारांची संख्या अधिक होती. एवढ्या मोठ्या संख्येने जेव्हा तरुण वर्ग ग्रामपंचायत निवडणुकीत उतरतो आहे, याचा अर्थ त्यांना त्यांच्या गावाचा विकास साधायचा आहे. आपल्या लोकशाहीसाठी हू खूपच आनंदाची आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.
हे युवक कोणत्याही पक्षाचे असले तरी मी त्या सर्वांचे अभिनंदन व्यक्त करते. महिला, युवती, युवक हे जास्तीत जास्त संख्येने राजकारणात उतरायला हवेत. आमच्या भागाच युवकांना नोकर्या नाहीत. यासाठी युवकांनीच पुढे येऊन आवाज उचलला पाहीजे, मग ते कोणत्याही पक्षाशी संबंधित का असेनात. मी असं म्हणत नाही की सर्वांनी राष्ट्रवादीतच यावे. युवकांनी कोणतीतरी विचारधारा अवलंबून समाजासाठी पुढे आले पाहीजे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूका या पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नाहीत. गावचे राजकारण हे त्या गावातील मोठ्या कुटुंबाच्या आसपास घुटमळते. तरी देखील अनेक तरूण पुढे येऊन निवडणुकीत उतरताना दिसत आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. एखाद्यावेळेस पक्षाने तिकीट नाकारले तरी अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी युवकांनी ठेवली आहे. उरणमधील जास्तीत जास्त तरुणांनी अशाप्रकारे पुढे यावे, असे आवाहन मी करते. ज्यांना कुणाला मदतीची गरज भासेल त्यांनी मला हक्काने सांगावे, पक्षाच्या भिंती बाजूला सारून त्यांच्या मदतीसाठी मी तयार आहे.