लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 1 डिसेंबर 2022उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे आणि म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड सुरेश ठाकूर, सरचिटणीस अनिल जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि उरण युनिटचे कार्याध्यक्ष मधूकर भोईर यांच्या मध्ये झालेल्या बैठकी मध्ये कंत्राटी कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये प्रामुख्याने कंत्राटी सफाई कामगारांना गेले दोन वर्ष पासून बोनस ठेकेदारा कडून मिळत नव्हता. तसेच ESIC या सरकारी आरोग्य विम्याचे खातेही उघडलेले नव्हते . तसेच भविष्य निर्वाह निधीची नियमाप्रमाणे जेवढी आवश्यक आहे ती भरावयाची रक्कम भरण्यात आलेली नव्हती . कायम कर्मचाऱ्यांची गेले दोन वर्ष मेडीक्लेम पाॅलीसी सुद्धा काढण्यात आलेली नव्हती . सदर मेडीक्लेम पाॅलीसी पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात कंत्राटी कर्मचाऱ्यांतर्फे मागणी करण्यात आली होती ती सुद्धा मागणी प्रलंबित होती.कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या.या समस्या मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या समोर मांडण्यात आले. नवनिर्वाचित मुख्याधिकारी राहूल इंगळे यांनी कायदेशीर बाजू तपासून सफाईचे अत्यंत महत्त्वाचे काम करणारे कंत्राटी सफाई कामगारांना ठेकादारामार्फत कायदेशीर बोनस देणे बाबत आदेश दिले. आदेश दिल्याप्रमाणे मे. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट प्रा. लि. या ठेकेदारामार्फत रक्कम रू. 5300 /– रूपये पहिल्यांदा बोनस मिळाल्या बद्दल मुख्याधिकारी राहूल इंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आभार मानले.
आणि किमान वेतन, नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी आणि ESIC वीमा योजना या उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करून न्याय द्यावे अशी विनंती म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे केली आहे.