लोकदर्शन 👉 अरुण वैतकार
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य च्या सततच्या प्रयत्नाने अधिसंख्य पदावर अधिकारी कर्मचारी यांच्या सेवाविषयक लाभ आणि निवृत्ती वेतन (पेन्शन)देण्यात येणार असल्याचे आज मंत्रिमंडळामध्ये सविस्तर चर्चा करून त्यावर निर्णय देण्यात आला आहे. त्या संदर्भातील परिपत्रक लवकरच जारी करण्यात येईल असे सुद्धा निर्देश मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी दिले आहे.
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संदर्भात अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यां बद्दल सतत पाठपुरावा करत होती. संघटनेच्या प्रयत्नाला मोठे यश प्राप्त झालेले आहेत.
अधिसंख्य पदावर असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना थोडा दिलासा देणारा निर्णय आज मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला. अधिसंख्य विषय असो व अधिकारी ,कर्मचारी संदर्भात या कुठलेही विषया करिता धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सातत्याने पाठपुरावा करत असते. त्याचे फलित म्हणून आज अधिसंख्य कर्मचाऱ्यां संदर्भात आपल्याला मोठा निर्णय आपल्या पदरी पाडून घेता आला. हे आपल्या संघटनेचे मोठे यश आहे. त्याकरिता
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले साहेब, महासचिव शरद उरकुडे, राज्य उपाध्यक्ष विलास डाखोळे, राज्य उपाध्यक्ष हरिष खुजे, कार्याध्यक्ष विनोद ढोरे, उज्वल रोकडे, रामचंद्र चुकांबे, दिवाकर कोठे, राजू बुधे,धर्मेंद्र बुधे, यशवंत कातरे, किशोर चिडे, अरविंद लोही, श्याम ढोले नलिनी ढोले, शितल गावडे, अनुराधा थोटे आणि धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले आहे.