उप्परवाही येथे कबड्डीचा थरार : आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या सौजन्याने विजय क्रांती युवक क्रीडा मंडळ उप्परवाही तसेच उप्परवाही ग्रामस्थ यांच्या विद्यमाने दिवस – रात्र कालीन कबड्डी सामन्याचे आयोजन दिनांक २६ व २७ नोव्हेंबर रोजी श्री गजानन महाराज संस्थान उप्परवाही च्या भव्य पटांगणात करण्यात आले. या स्पर्धेच्या विजयी संघाला आ. सुभाष धोटेंच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. येथे अनेक कबड्डी संघाने उत्तम कामगिरी केली असून कबड्डी चा थरार पाहण्यासाठी कबड्डीप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यात जय बजरंग क्रीडा मंडळ कोंडा या संघाने प्रथम, द्वितीय बक्षिस – राळेगाव युवक मंडळ संघाने द्वितीय, जय भवानी युवक मंडळ दुर्गापूर संघाने तृतीय तर उप्परवाही युवक मंडळ संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला सर्व विजयी संघांना आ. धोटे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की युवकांच्या स्पर्धात्मक कौशल्यांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे खूप महत्त्वाचे आहे. या मधून नवनवीन युवकांमधून कौशल्यपूर्ण स्पर्धक निर्माण होण्यासाठी आणि खेळाडू वृत्तीला चालना मिळते. संघ भावना वाढीस लागते.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, प्रोग्रॅम मॅनेजर अंबुजा सिमेंट फाउंडेशन श्रीकांत कुंभारे, विजय क्रांती कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे, महासचिव वि.क्रां.कामगार संघ. बबन आत्राम, उपसरपंच अनिल कौरसे, माजी उपसरपंच गुणवंत तलांडे, माजी पोलीस पाटील लक्ष्मण बोढे, ग्राम पंचायत पंचफुला काकडे, शंकर गुरुकुंठावार, गोविंद गेडाम, दिलीप येलादी, आशाताई आत्राम, साईनाथ सिडाम, सुधाकर ताजणे, दशरथ राऊत, मानसिंग पांचाल, स्पर्धक, गावकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here