ईपीएस९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ईपीएस९५ राष्ट्रीय संघर्ष समिती जिल्हा चंद्रपूर तालुका जिवतीचा मेळावा दिनांक २६/११/२०२२ रोज शनिवारला शासकीय विश्राम गृह गडचांदुर येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.श्री.एस.एन.आंबेकर यांचे अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामचंद्र मुसळे, जिल्हा सचिव श्री.अरुण जमदाडे, जिल्हा सहसचिव श्री. दिपक जोगी, जिल्हा कोष्याध्यक्ष श्री.प्रभाकर शेंडे,चंद्रपूर तालुका कोष्याध्यक्ष श्री. सुरेश आढे,राजरा तालुका सचिव कवडु डेरकर,कोरपणा तालुका अध्यक्ष श्री. सुधाकर चौधरी,यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सभेला जिल्ह्यातील विज महामंडळ, वनविकास महामंडळ,राज्य परिवहन महामंडळ,मानीकगड सीमेंट,अंबुजा सीमेंट,अल्ट्राटेक सीमेंट सह ईतर उध्योगाताल ईपीएस९५ पेनशनरस बहुसंख्येनी उपस्थित होते.सभेला परीवहन महामंडळाचे अरुण जमदाडे,सुरेश आढे,एम.ईलचे दिपक जोगी,अल्ट्राटेकचे झाबा जमदाडे,जिल्हा बैंकेचे कवडु डेरकर,सुभाष मसे, विदर्भ कोकण ग्रामीण बैंकेचे मिलिंद गड्डमवार यांनी संबोधित केले.
अध्यक्षिय भाषणात पेनशनरचे संबंधात सर्वोच्च नयालयाने दिनांक ०४/११/२२ दिलेल्या निकालाबाबत पेनशरसमधे असलेला संभ्रम निकालाबाबतची विसतृतपणे सोप्या भाषेत माहीती कथन करून संभ्रम दूर करण्यांत आला.सभेची प्रस्तावना सुधाकर बोरकर तर आभार प्रदर्शन अरुण जमदाडे यांनी केले. सभा उत्तम व रमणीय स्थळी आयोजित करुण अतिशय उत्तम प्रकारे सभेची व्यवस्था केल्या बद्दल अध्यक्ष महोदयांणी जिवति तालुका अध्यक्ष श्री. सुधाकर बोरकर यांचे विशेष आभार व्यक्त करुण सभा समाप्त झाल्याचे जहीर केले. HB
सभा यशस्वीते करीता कृष्णा भागवत,सुधाकर बोथले,वसंत कोंगरे,रत्नाकर तेलगोटे,सतिश यमसलवार,मानीक उघाडे,वामन मुद्दलवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here