समस्त कोष्टी हितकारिणी मंडळाचे स्नेहसंमेलन व संगम सुरांचा लाईव्ह उत्साहात संपन्न

 

लोकदर्शन ठाणे👉(गुरुनाथ तिरपणकर)-

“सहयोगातून समाजोन्नती”या ब्रिद वाक्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कोष्टी समाजातील बंधु-भगिनी एकत्र यावेत या अनुषंगाने समस्त कोष्टी हितकारिणी मंडळ ,ठाणे च्यावतीने शनिवार दि.२६नोव्हेंबर २०२२रोजी मोमाई माॅ कृपा वाडी,आर माॅल जवळ,ठाणे येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम तसेच संगम सुरांचा लाईव्ह अतिशय उत्साहात साजरा झाला. सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ठाणे व मुंबई परिसरातील समाज बांधवांकरिता प्रथमच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय देवांग देवांगन कोष्टी कोष्टा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.अरुणराव वरुडे,अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री.सतीशराव दाभाडे,नागपूर,महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.पंडितराव इदाते,समस्त कोष्टी हितकारिणी मंडळाचे अध्यक्ष श्री.अरुणराव हांडे,उपाध्यक्ष श्री.अनंतराव अलोने,महिला अध्यक्षा सौ.मंगलाताई विलास अलोने,विदर्भ कोष्टी हितकारिणी मंडळाचे अध्यक्ष श्री.गजाननराव धोपे,नागपूर,महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाचे महासचिव श्री.रामचंद्र निमणकर(इचलकरंजी)अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे मुंबई व कोकण विभागाचे उपाध्यक्ष श्री.गुरुनाथ तिरपणकर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस माता चौंडेश्वरी प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच श्रीमती मनीषाताई नवरे यांनी गणेश वंदना सादर करुन श्री.नागेश खोडवे व श्री.शशिकांत धोपे यांनी स्वागत गीत सादर केले. समस्त कोष्टी हितकारिणी मंडळाच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व शील्ड देऊन सत्कार करण्यात आला.स्नेहसंमेलनाच्या या शुभप्रसंगी मुंबई व ठाणे विभागातील जेष्ठ समाज बांधव व भगिनींचा,कोविड काळात उत्कृष्ट कार्य केलेल्या डाॅक्टरांचा,गुणवंत विद्यार्थ्यांचा,क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा,सूरताल समूहाच्या संस्थापिका,सूरताल समूहाचे सर्व कलावंत व पदाधिका-यांचा शाल,श्रीफळ,शील्ड देऊन सत्कार करण्यात आला.सोबतच विद्यार्थी व कलावंतांना मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्र ही देण्यात आली.उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन याप्रसंगी केले.श्री.अरुण भाऊ वरुडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजनाबद्दल पदाधिका-यांचे कौतुक करून शाबासकी दिली तसेच सर्व समाज बांधवांचे ही आभार मानले.समाजाच संघटन अतिशय महत्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.श्री.सतीश दाभाडे,श्री.पंडितराव इदाते यांनी सुध्दा उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले.सूरताल समूहाच्या प्रमुख सौ.मंजुषाताई यांनी सुध्दा आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.श्री.अनंतराव अलोने यांनी मंडळाच्या कार्याचा अहवाल वाचन केल.तत्पूर्वी अरुणराव हांडे यांनी स्नेहसंमेलन घेण्याबाबतची भूमिका आपल्या प्रास्ताविक भाषणातून स्पष्ट केली.तसेच गेल्या तीन वर्षात मंडळाने केलेल्या कार्याची माहिती उपस्थित अतिथी व समाज बंधूंना दिली.कार्यक्रमाच्या वेळी विशाल डाके मुंबई यांनी पीपीटी च्या मार्फत समस्त कोष्टी हितकारिणी मंडळाच्या कार्याचा आढावा,समकोश सप्तपदी चा आढावा उपस्थितांना सांगितला.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सौ.अश्विनीताई धोपे,डोंबिवली यांनी केले.शेवटी आभार सौ.मंगलाताई अलोने यांनी मानले.सर्व सोहळा आटोल्यानंतर समाजाच्या इतिहासात प्रथमच संगम सुरांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा सूरताल समूहाच्या सर्व कलावंतानी सादर केला.अकोला येथील सुप्रसिद्ध गायक,समाज बंधू शरद हिंगे आणि सौ.अश्विनी अलोने हांडे यांनी संगम सुरांच्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा चे अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.संगम सुरांच्या या कार्यक्रमामध्ये अमळनेर येथील आपले समाज बंधू तसेच लोकप्रिय गायक नागेश जी खोडवे,अकोला येथील उत्कृष्ट समाजसेवक शशिकांत धोपे,गान कोकीळा श्रीमती मनीषाताई नवरे,मुंबईतील आपल्या समाजाच्या प्रसिद्ध गायिका सौ.कल्पनाताई भिवापूरकर,सदाबहार गायक व सख्खे बंधू विकास व अनंत अलोने,समाजातील पायलट व कलावंत सागर अलोने मुंबई,तसेच शरद हिंगे यांनी सुरेख जुन्या व नवीन गाण्यांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अनंत अलोने यांच्या लहान मुलीने आपल्या वडीलांसोबत गाणे गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.स्नेहसंमेलनाला मुंबई सह ठाणे,कल्याण,डोंबिवली,बदलापूर,नेरुळ,वाशी आदी विभागातून मोठ्या प्रमाणात समाज बंधू-भगिनी उपस्थित होते.शेवटी उपस्थित समाज बांधवांनी रुचकर व चविष्ट भोजनाचा आस्वाद घेतला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *