आ. महेश बालदी यांच्या हस्ते बालाजी कॉर्नरचे उदघाटन.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 27 .नोव्हेंबर 2022उरण मधील पेढे, बर्फी स्वीट्सचे ग्राहकांचे विश्वसनीय दुकान म्हणून बालाजी कॉर्नर प्रसिद्ध आहे. बालाजी कॉर्नर दुकानातील पेढे, बर्फी तसेच स्वीट्सच्या पदार्थांना ग्राहकांची मोठी पसंती आहे. बालाजी ग्रुप, सतेरे ब्रदर्स, पडवळ ब्रदर्स हे मराठी माणसाने स्थापन केलेले उद्योग समूह आहेत . या समुहाच्या माध्यमातून बालाजी कॉर्नर या स्वीट्स आणि स्नॅक्सच्या दुकानाचे उरण शहरातील सेंटमेरी हायस्कूल समोर शाखा सुरु झाली आहे. बालाजी कॉर्नरचे स्वीट्स आणि स्नॅक्सचे दुकान जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे याचा सर्वांना अभिमान आहे. असे मत आ. महेश बालदी यांनी उरण येथे व्यक्त केले.

दिनांक 27/11/2022 रोजी सायंकाळी 6 वाजता बालाजी ग्रुपच्या माध्यमातून उरण शहरात सेंटमेरी हायस्कूल समोर सुरु झालेल्या बालाजी कॉर्नर या स्वीट्सच्या दुकानाचे उदघाटन विद्यमान आमदार महेश बालदी यांनी फीत कापून केले. यावेळी बालाजी ग्रुप, सतेरे ब्रदर्स, पडवळ ब्रदर्सच्या सर्व सदस्यांचे, बालाजी कॉर्नरच्या टीमचे आमदार महेश बालदी यावेळी कौतुक केले.स्वीट्स आणि स्नॅक्सच्या बाबतीत बालाजी कॉर्नरने एक ब्रँड तयार केले आहे. नक्कीच हा व्यवसाय पुढे जाईल. विविध पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरतील. व हा उद्योग जास्तीत जास्त चालेल. असे सांगत बालाजी कॉर्नरच्या नवीन वाटचालसाठी महेश बालदी यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

सतेरे ब्रदर्सचे जयवंत सतेरे, दिनेश सतेरे, कैलास सतेरे,गिरीजात्मक सतेरे,पडवळ ब्रदर्सचे राकेश पडवळ, बालाजी ग्रुपचे स्वप्नील सतेरे, मयुरेश जाधव, शुभम सतेरे, गुड्डू यादव आदी उद्योजक यावेळी उपस्थित होते.नगरसेवक रवीशेठ भोईर,केगावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, नगरसेवक राजू ठाकूर,नगरसेवक कौशिक शहा,मनन पटेल, हितेश शहा,विशाल पाटेकर,अजित भिंडे,प्रीतम पाटील,कुणाल शिसोदिया, जस्मिन गॅस,संदीप पानसरे आदी मान्यवरांनी बालाजी कॉर्नरला भेट दिली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *