लोकदर्शन 👉 मोहन भारती
सरस्वती शिक्षणप्रसारक मंडळ संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय च्या वतीने दिनांक *26 नोव्हेंबरला संविधान दिन* साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून *संविधान सन्मान रॅली**चे आयोजन करण्यात आले. ही रॅली गडचांदूर शहरातील महात्मा फुले चौक, गांधी चौक, संविधान चौक, बसस्थानक मार्गे विद्यालयात येऊन पोहोचली. विद्यार्थ्यांनी संविधान दिन चिरायू हो, भारत माता की जय, इत्यादी नारे देऊन शहरवासी यांचे लक्ष वेधून घेतले.
रॅलीची सांगता विद्यालयातील सभागृहात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजिन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते तर प्रमुख अतिथी म्हणून, सचिन कुमार मालवी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती कोरपना व संजय गाडगे पर्यवेक्षक हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मालवी साहेबांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व प्रश्न उत्तराच्या माध्यमातून समजावून दिले. तसेच गाडगे सर यांनी संविधानाची आवश्यकता सांगितली. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी या देशाची वास्तविक परिस्थिती व संविधानाची आवश्यकता उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. संविधानातील अनेक कलमांचा मागवा घेत घेत प्रास्ताविकेतील मतितार्थ उलगडण्याचा प्रयत्न केला. तसेच संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्याची जाण प्रत्येकाने अंगी बाळगावी असा विचार व्यक्त केला. संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन बावनकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. ज्योती चटप यांनी तर कार्यक्रमाचे संचालन सेवाजेष्ठशिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राजेश मांढरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.