लोकदर्शन 👉 मोहन.भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ,गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय,उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे शिक्षक पालक सभा दिनांक 25 नोव्हेंबर ला संपन्न झाली. अध्यक्ष स्थानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक तसेच गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे संचालक डॉ अनिल चिताडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे ,महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविदयालय गडचांदूर च्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ स्मिता चिताडे , उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षक एच बी मस्की , शिक्षक पालक संघाचे पालक सहसचिव श्री उमेश पालिवार तसेच पालक सदस्य सौ सुनिता जेनेकर श्री वाघमार उपस्थित होते, याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पुष्पगुच्छांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .
याप्रसंगी मुख्याध्यापिका स्मिता चिताडे यांनी शिक्षक पालक सभा दरवर्षी आयोजित करण्यामागचे महत्व सांगितले तसेच शाळेद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम करण्याकरता राबविण्यात येत असलेल्या योजना विशद केल्या पालकांच्या समस्याचे निराकरण करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीत पालकांचा सहभाग असावा असे प्रतिपादन केले श्री धनंजय गोरे यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले .डॉ अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणात थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन च्या लहानपणीच्या गोष्टी सांगून प्रत्येक मुलांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब कशी लपलेली असते याबाबत विद्यार्थी व
पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वर्ग 10 वि व 12 वि च्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र परीक्षेचे पेपर पालकांना दाखवून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन हरिहर खरवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्वेतलाना टिपले यांनी केले.
सभेला पालक ,विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,