बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट येथे संविधान दिन साजरा*

लोकदर्शन 👉 राहुल खरात

बंकटस्वामी विद्यालय खडकी घाट ता.जि.बीड या विद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ह भ प बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मु.अ.मा. श्री संजय सावंत सर आणि ज्येष्ठ शिक्षक श्री रामहरी रिंगणे सर, श्री अशोक आनेराव सर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याप्रसंगी संविधानाचे वाचन खेळाचे शिक्षक रिंगणे सर यांनी केले नंतर भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल सविस्तर माहिती मुख्याध्यापक सावंत सर यांनी सांगितले तसेच याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थी यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे केली नंतर वर्ग पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मिळून संविधान फेरी गावाच्या मुख्य ठिकाणाहून काढण्यात आली
शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना दहा मिनिटाची इंटरवेल देऊन पुन्हा शालेय कामकाजाला सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here