*११ एप्रिल कटगुणकरांनी शिक्षण दिन व सर्व समाजाने सत्यशोधक पद्दतीने विवाह करावेत तरच गावचा विकास !!!* *सत्यशोधक रघुनाथ ढोक*

 

लोकदर्शन 👉 राहुल खरात

सातारा /कटगुण-महात्मा फुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ ,ग्रामपंचायत कटगुण आणि पंचायत समिती खटाव यांचे वतीने या वर्षी थोरसमाजसुधारक महात्मा फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिनानिमित्त व महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवीवर्षानिमित्त सत्यशोधक चळवळीतील समाजसेवक सत्यशोधक रघुनाथ ढोक ,संजय करपे ,डॉ.वसुधा कर्णे ,सुरेश शेंडे ,राजेंद्र नेवसे ,संजय दुधाळ,अजित जाधव आणि जयदीप शिंदे यांचा माजी जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष वं विध्य्मान संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.प्रदीप विधाते यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह ,नारळ आणि महावस्र व पुष्पगुच्छ देऊन हा सोहळा महात्मा फुले नगरीत दि.२३.११.२०२२ रोजी रात्री ८ वाजता संपन्न केला. कार्यक्रमाचे सुरुवातीला महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सत्यशोधक ढोक यांच्या शुभहस्ते भव्य पुष्पहार अर्पण केला तर मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रांतीची मशाल पेटवून महापूर्षांचे घोषणांनी आसमंत घुमघुमला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रदीप विधाते म्हणाले की कटगुण करांनी पुण्यतिथी महोसत्व भरवून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या थोर मंडळींचे विचार व अनुभव ऐकून नक्कीच परिवर्तन वादी गाव बनेल अशी अपेक्षा बाळगतो . तसेच गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
या प्रसंगी स्त्कार्थी सत्यशोधक ढोक यांनी महाराष्ट्र व तेलगांना राज्यात सत्यशोधक विवाह चळवळ कशी रूजविली. तसेच कोव्हीड काळातील अनुभव सागून विज्ञानानिष्ठ बनावे आणि अंधश्रद्धा कर्मकांड याला फाटा देण्याचे आव्हान करीत, कटगुण मधील सर्व बांधवानी या पुढे महात्मा फुले यांचे मुळ गाव म्हणून सत्यशोधक पध्द्तीने आपल्या मुलांचे विवाह तसेच ११ एप्रिल शिक्षण दिन साजरा करून महात्मा फुले जयंती साजरी करून गावाची आगळीवेगळी ओळख निर्माण करावी. तरच गावचा विकास लवकर होण्यासाठी मदत होईल असे देखील म्हणाले.
डॉ.कर्णे म्हणल्या की आपण सावित्रीच्या लेकी म्हणून पुढे आले पाहिजे तसेच त्यांना कुटुंबांतील सर्वांनी साथ देणे ही आजची गरज आहे परंतु महिलांनी आपले चरित्र ,वागणूक या मध्ये स्वैराचार निर्माण होणार नाही याची पण दक्षता घ्यावी अशा म्हणाल्या.
कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सुधीर गोरे आणि आभार मानताना संजय करपे म्हणाले की या भागातून जो महामार्ग गेला आहे त्याला महात्मा फुले यांचे नावे क्रांती मार्ग आणि सातारा येथे सुरु होणारे महाविधालयास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नाव ध्यावे या ठरावास ग्रामस्थांनी हात उंचावून अनुमोदन दिले. यावेळी नायगाव व माण खटाव परिसरातील अनेक मान्यवरांचे सत्कार केले.ग्रामपंचायत सरपंच ,सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते तर जयदीप शिंदे यांनी ग्रंथालयास ५०० व रघुनाथ ढोक यांनी १५० पुस्तके ११ एप्रिल रोजी देण्याचे व इतरांनी बहुमूल्य सहकार्य करण्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here