लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित *सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर**येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय गाडगे, ज्योती चटप , जीवन आडे होते. कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी जीवन आडे यांनी **राष्ट्रीय एकात्मतेची**विद्यार्थ्यासह शिक्षकांना शपथ दिली. **मुख्याध्यापक धर्मराज काळे**यांनी अध्यक्षीय भाषणातून विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांच्या कार्याची व त्यागाची जाणीव ठेवून भारताची एकात्मता आणि अखंडता अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असा संदेश दिला. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रस्ताविक सेवा जेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक सुरेश पाटील, जी. एन. बोबडे, माधुरी उंमरे, भुवनेश्वरी गोपमवार, बावनकर सर, मरसकोल्हे सर, लीलाधर मत्ते यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.