इन्फंट च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा च्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय स्थान संपादन केले असून 14 वर्षीय गटातून गोळा फेक, थाळीफेक स्पर्धेत ओम काळे याने द्वितीय स्थान तर मुली मध्ये गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक कु राखी उत्तरवार, थाळी फेक मध्ये कु. वैष्णवी तेलीवार ने प्रथम क्रमांक पटकविला, कराटे मध्ये कु तन्वी रामटेके, ओम चुंबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे आणि 17 वर्षीय गटातून गोळा फेक स्पर्धेत द्वितीय स्थान गणेश लामरोड, 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम स्थान ओम टोंगे आणि 200 मीटर धावणे स्पर्धेत रवींद्र राजपुरोहित याने तर 800 मीटर धावणे स्पर्धेत मंतोष किरकेटा या विद्यार्थ्याने द्वितीय स्थान पटकाविले आहे. या सर्व स्पर्धकांची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धे करता निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, सचिव तथा माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, सुभाष पिंपळकर, विष्णू गेडाम यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे तर पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here