लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 21 नोव्हेंबर 2022सिडकोने काढलेल्या उरण तालुक्यातील भूसंपादनाच्या नोटीफिकेशनला विरोध करण्यासाठी व शेतक-यांची, प्रकल्पग्रस्तांची मोट बांधून एकत्रित लढा देण्यासाठी उरण मधील ओएनजीसी वसाहत जवळ असलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात शेतकऱ्यांची , प्रकल्पग्रस्तांची बैठक संपन्न झाली. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काका पाटील, संतोष पवार, केगाव संरपच आशिष तांबोळी, म्हातवली माजी सरपंच
चारुदत्त पाटील, नागाव माजी सरपंच अनंत घरत, माजी पंचायत समिती सदस्य महेश म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे , अरविंद घरत आदि मान्यवरांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी सर्व प्रकल्प ग्रस्त बांधवांना एकत्र लढण्याच्या उद्देशाने एकजूट कशी महत्वाची आहे. यापुर्वी या एकजुटीच्या जोरावरच आपण लढे जनतेच्या रेट्याने आणि जनशक्ती घ्या जोरावरच जिंकलो आहोत या बाबत मार्गदर्शन केले. राजाराम पाटील यांनी सिडकोचा भूसंपादन कायदा, गावठाण विस्तार कायदा व इतर कायद्या विषयी उपस्थितांना माहिती दिली. रामचंद्र म्हात्रे यांनी चळवळ प्रामाणिकपणे सिडको आणि महसूल विभागाचा पूर्ण अभ्यास करून लढणे आवश्यक आहे हे सांगीतले. यावेळी उरण मधील शेतकरी,प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्र येत सिडकोच्या भू संपादनाला विरोध दर्शविला व सर्व शेतक-यांनी एकत्र येत हा लढा लढवावा असा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी संजय ठाकूर, श्रीराम म्हात्रे, अनंत घरत, मधुकर म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रशांत माळी, सुनिल भोईर, निलेश भोईर, सीताराम नाखवा, भालचंद्र म्हात्रे, हेमदास गोवारी, सुरज पाटील , के एल कोळी आदी मान्यवर तसेच उरण तालुक्यातील विविध गावातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.