नांदाफाटा येथील मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिरात १८२ नागरिकांची तपासणी ५८ रुग्णांवर होणार निशुल्क शस्त्रक्रिया सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा केला सत्कार

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन👉 -(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
औद्योगिक नगरी नांदा येथे लॉयन्स सेंटर सेवाग्राम वर्धा, लॉयन्स क्लब चंद्रपूर महाकाली, महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर सेंटर, स्वामी विवेकानंद युवा मंडळ नांदाफाटा, कॅलिबर फाउंडेशन गडचांदूर व गुरुदेव सेवा मंडळ कोरपना तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक सांस्कृतिक सभागृहात १९ नोव्हेंबरला विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात पार पडले.
या शिबिरात औद्योगिक परिसरातील १८२ नागरिकांची डॉक्टरांनी तपासणी केली. यातील ४६ रुग्णांना कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेकरिता बसद्वारे सेवाग्राम मेडिकल कॉलेजला नेण्यात आले. सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरीत १२ रुग्णांना दिनांक २६ नोव्हेंबरला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहेत.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळासाहेब चौधरी, उद्घाटक ह.भ. प. विठ्ठल डाखरे महाराज, प्रमुख अतिथी लॉयन्स क्लब व महावीर इंटरनॅशनलचे पदाधिकारी पूनम तिवारी, हरीश मुथा, देवेंद्र वर्मा, डॉ.स्वप्नेश चांदेकर, स्मार्ट व्हिलेज बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर, निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, नांदा ग्रामपंचायतच्या सदस्या आशाताई खासरे, प्रिया काळे, मारोती जमदाडे, मारोती बुडे, मनोज शेरकी, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर राऊत, रूपाताई पानघाटे, सुवर्णा झाडे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कॅलिबर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर यांनी प्रास्ताविकातून कोरपना तालुक्यामध्ये नेत्र रुग्णांची संख्या अधिक असल्याने अनेक ठिकाणी अशा प्रकारचे शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
नांदा येथील एजाज अल्ताफ शेख, चेतन सुभाष आत्राम, शुभम इटनकर या तीनही होतकरू युवकांची सैन्यामध्ये निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन नितेश मालेकर यांनी केले. विविध संघटनांनी व प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर घेण्याकरिता सहकार्य लाभल्याने अभय मुनोत यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्वामी विवेकानंद मंडळ नांदाचे अध्यक्ष पुरुषोत्तम निब्रड, हारुण सिद्दिकी, अरविंद इंगोले, गणेश लोंढे,राजू मोहितकर, महेश राऊत, प्रवीण पोटवडे, सचिन बोढाले,विवेक खनके,हरीश खंडाळे, शोएब शेख,रतन ठाकरे,राजू काळे,शंकर राऊत, सोनू बेग, अश्विन कस्तुरे, प्रफुल बोढाले, स्वप्निल कस्तुरे,साईनाथ इटणकर,अशोक क्षीरसागर या सर्वांनी सहकार्य केले. शिबिरात तपासणी करिता आलेल्या नागरिकांची योग्य ती व्यवस्था युवक मित्रांनी केली परिसरातील नागरिकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे सर्व रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असून विनामूल्य कृत्रिम भिंगारोपण व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *