हजरत टिपू सुलतान जयंती निम्मित मिरजेत आभा हेल्थ कार्ड व आयुष्यमान हेल्थ नोंदणी संपन्न…*

लोकदर्शन मिरज 👉 राहुल खरात
दि. २० नोव्हेंबर २०२२

हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मिरज शहरांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगली जिल्ह्याच्या वतीने आभा हेल्थ कार्ड व आयुष्यमान भारत मोफत कार्डचे नोंदणी करण्यात आली याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला अशी माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे सांगली महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष शाहनवाज सौदागर यांनी दिली. यावेळी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बी. ए. मौलवी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच हाजी सलीम सौदागर, हाजी रियान अहमद शिकलगार, हाजी शाहनवाज सौदागर, ज. यासर सौदागर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संयोजन इरफान बागवान, रशीद तारलेकर, मुज्जफर सनदी, इसाकभाई सौदागर, अब्दुल तासगावकर, समीर अत्तार, रमजान सौदागर, अशरफ सौदागर, जुबेर सौदागर, नईम मोमीन, अस्लम इनामदार, इम्रान इनामदार, इजाज नायकवडी आदींनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here