मधुकर भोईर यांच्या वाढदिवसा निमित्त मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी दिल्या शुभेच्छा.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 16 नोव्हेंबर 2022उरण नगर परिषदेचे प्रामाणिक कर्तव्यदक्ष कर्मचारी तथा मुन्सिपल एम्प्लॉय युनियन कार्याध्यक्ष/उरण नगरपालिका कर्मचारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष मधुकर भोईर यांचा 50 वा वाढदिवस उरण नगर परिषदे मध्ये उरण नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत केक कापून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उरण नगर परिषदेच्या कर्मचारी अधिकारी वर्गांनी मधुकर भोईर यांना सुख शांती, समृद्धी दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनीही मधुकर भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here