लोकदर्शन प्रतिनिधी:👉- स्नेहा उत्तम मडावी
दैनिक झुंझार केसरी वर्धापन दिन नुकताच जय भगवान हॉल नौपाडा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटक दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर, टाइम्स २४ न्युज चॅनेलचे उप कार्यकारी संपादक व होप फौंडेशन चे अध्यक्ष डॉ प्रवीण निचत , मुनीर खान मुख्य संपादक दैनिक झुंझार केशरी, व इतर मान्यवर उपस्तिथीत होते.
डॉ प्रवीण निचत हे शतायुषी निसर्ग उपचार व संशोधन केंद्र तर्फे आरोग्य सेवा, वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना रोगांवर टेलिफोनद्वारे मोफत “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. डॉ. प्रविण निचत (अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे. हल्ली त्यांनी 65 पारधी समाजातील कुटुंबांना दत्तक घेतल्या चे सांगितले व असेच विविध ठिकाणी त्यांचे उपक्रम चालूच असणार आहे ज्यांना त्यात सहभागी व्हाचे असेल त्यांना होप फौंडेशन चे दरवाजे सदैव खुले आहेत. आत्ता पर्यन्त उत्कृष्ट पत्रकार व वैदकीय क्षेत्रात उलेखनीय कामगिरी केल्या बद्दल डॉ. प्रवीण ह्यांना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे एकूण 195 पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.
त्यांचे मनोगतात असे म्हणाले कि वृत्तपत्र पत्रकार हा जनमानसाचा आरसा असतो व तो आपल्या समस्यांना वाच्या फोडतो. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ राहण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण दिल्या बद्दल मुनीर खान हांचे विशेष आभार , त्या वेळी विविध क्षत्रतील व्यक्तींचा सन्मान केला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.