लोकदर्शन मुंबई 👉: महेश कदम
मा. आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त “लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२” केशव दाते उधान, दादर येथे आयोजित करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्य साधून श्री. जितेंद्र कांबळे यांच्या विद्यमाने ५० वर्षावरील लेजेंड क्रिकेट स्पर्धा २०२२ याचे क्रिकेट सामना आयोजक करण्यात आले होते, आयोजनाचे वैशिष्ठ् म्हणजे श्री. जितेंद्र काबळे यांच्या नियोजनात प्रतेकी ८ संघ निवडण्यात आले होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंना सामना सुरु होण्या पूर्वी समान रंगाची टी-शर्ट देण्यात आले. तसेच विविध ठिकाणांहून आलेल्या खेळाडूंना दुपारी आहाराची सोय सुद्धा केली होती. सामना संपल्यानंतर पराभूत संघातील ११ खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांचे क्रिकेट प्रेम जागरूक करण्याचे महत्त्वाचे काम नियोजक निष्ठेने करीत होते. ८ संघातील प्रत्येक खेळाडूंचे कौतुक व प्रोत्साहन देण्याचे काम कार्यकर्ते करीत होते. निस्वार्थी पणे सेवाभाव योगदान देण्याचे काम आयोजक करीत होते. यात संघ: सायन स्पोर्ट्स क्लब, आय सी बोरीवली, मंदार इलेव्हन, घाटकोपर इलेव्हन, आर जे के, साईनाथ, शिवाजी पार्क, बाल प्रकाश असे ८ संघ होते, त्यात विजेता संघ: मंदार इलेव्हन संघ यांना लेजेंड क्रिकेट ट्रॉफी २०२२ सन्मान मिळाले, उपविजेता: बाल प्रकाश संघ ठरले, बेस्ट बॅट्समेन : बाल प्रकाश संघाचे श्री. शैलेश यांना प्रदान करण्यात आले, बेस्ट बाॅलर: मंदार इलेव्हन चे श्री. पनम यांना देण्यात आले, मॅन ऑफ सिरीज: मंदार इलेव्हन चे श्री. हेमंत यांना देण्यात आले. क्रिकेट स्पर्धेतील विजेते संघ, उपविजेते संघ, उत्कृष्ट खेळाडू यांना पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. मान्यवर उपस्थित मध्ये मनोज शाह, संतोष सुखदे, नितीन बेलनेकर, संदीप तिवरेकर, दादा शिरसेकर, अमोल जाधव, निलेश कदम, राजु सावला, प्रविण गुरव, प्रमोद सावंत, अमित मिठबावकर, राजेश धस, आदर्श दुबे, ओमकार पाटील, ओमकार गुरव, जितेंद्र गुप्ता, अमोल मोहिते, नयन काबळे, सचिन खंडाळे, योगेश रावनंग, रवि चेऊलकर, यश विलनकर, बाबु सर असे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून लेजेंड क्रिकेट सामना वीरांना प्रोत्साहन देत होते.