,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,
-गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यापीठांनी मान्यता दिलेल्या विद्याशाखानिहाय पीएच.डी मार्गदर्शकांची यादी ऑक्टोंबर 2021 पर्यंत प्रकाशित केली आहे मात्र त्यानंतर मागील एक वर्षाच्या कालखंडामध्ये विद्यापीठांने वेगवेगळ्या विद्याशाखेनुसार अनेक प्राध्यापकांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली मात्र पुढे मार्गदर्शकांची यादी अद्यावत केली नाही त्यामुळे अनेक संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करीत असताना अडचणी निर्माण झाल्या आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने पीएच.डी मार्गदर्शकांची यादी अद्यावत करण्याची मागणी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांचे कडे केली आहे
उच्च शिक्षणामध्ये पीएच.डी संशोधनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.गोंडवाना परिक्षेत्रातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक पीएचडी प्राप्त असून त्यांना विद्यापीठाने मार्गदर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. मात्र गेल्या एक वर्षात मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त प्राध्यापकांची नावे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नसल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन करीत असताना करताना व मार्गदर्शकांची निवड करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे गोंडवाना विध्यापिठ परिक्षेत्रात विविध विषयांमध्ये संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.पीएचडी प्रवेशासाठी दरवर्षी पेट परीक्षा आयोजित करीत असल्यामुळे सर्वच विद्याशाखेत पीएचडी करण्यासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील मान्यताप्राप्त संशोधक मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थी यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे आहे
विद्याशाखा निहाय पीएचडी मार्गदर्शकांची यादी अद्यावत राहिल्यास गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये दर्जेदार संशोधनाला वाव मिळेल हा उदात्य हेतू लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अनिल चिताडे यांना निवेदन दिले असून या संदर्भात चिताडे सर यांनी त्वरित पीएचडी मार्गदर्शकांची यादी अद्यावत करण्याचे आश्वासन दिले आहे याबद्दल परीक्षा नियंत्रकांचे संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले असून या शिष्टमंडळामध्ये गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर चे अध्यक्ष व सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे, संघटनेचे सचिव व सिनेट सदस्य डॉ. विवेक गोरलावार, सहसचिव डॉक्टर प्रमोद बोधाने, संघटनेचे विभाग समन्वयक डॉ. दिनकर चौधरी, डॉ. संजय फुलझले ,डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.