,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन 👉 :– (प्रा,अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारत जोडो यात्रेच्या समर्थनात जनजागृती करिता गडचांदुर शहरात काँग्रेसच्या वतीने रविवारी बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली सचीन भोयर पेट्रोल पंप – बाबाराव शेडमाके चौक – महात्मा फुले चौक – लाल बहादूर शास्त्री शाळा – हनुमान नगर – मुक्तिधाम – शिवाजी चौक – मानिकगड चौक – रामकृष्ण हॉटेल – मधुबन बेकरी ते गांधी चौक पर्यंत करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, देशातील भेदभाव आणि विद्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा, या जन आंदोलनाच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारी, व सर्व सामान्य जनतेच्या न्याय्य हितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून सारे एकत्र येऊ यात आणि हे जन आंदोलन यशस्वी करू या असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जनसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि या सर्व प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून देशाच्या जनतेला दुःखाच्या खाईत लोटणाऱ्या सरकारचे डोळे उघडण्यासाठी भारत जोडो यात्रा सुरू केली असून आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन सर्व सामान्यांच्या हिताची लढाई अधिक मजबूत करू या असे आवाहन केले.
या प्रसंगी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, नगराध्यक्षा सविता टेकाम, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव थीपे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, नगरसेवक पापय्या पोनमवार, संतोष महाडोळे, विक्रम येरणे, राहुल उमारे, अरविंद मेश्राम, स. गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, प्रा. आशिष देरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नितीन बावणे, शहर अध्यक्ष माधुरी पिंपळकर, सचिन भोयर, अर्चना वांढरे, जयश्री ताकसांडे, हंसराज चौधरी, रऊफ खान, रोहीत शिंगाडे, बाबाराव पुरके, अभय मुनोत, देविदास मुन, दीपक येवले, रोशन आस्वले, दीपक खेकारे, वहाबभाई, सुदर्शन डवरे, शामराव सलाम यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
,,