हंसराज अहीर यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करूनसाजरा

 

लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने माननीय श्री हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे फळ वाटप करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर (भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष )होते . प्रमुख अतिथी म्हणून श्री सतीश उपलंचिवार (शहराध्यक्ष गडचांदूर), डॉक्टर आकाश जीवने ,,डॉक्टर घाटे ,श्री संदीप शेरकी

,उपस्थित होते श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या भाषणात श्री हंसराजजी अहिर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला श्री हंसराजजी अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री हे सर्व सामान्य जनतेचे कैवारी म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना शेतीचा मोबदला मिळवून दिला,प्रकल्प ग्रस्तांना नौकरी मिळवून देण्यासाठी सिंहांचा वाटा उचलला अशा अनेक विकास कामांना चालना दिली असे सांगितले. तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला पद्माकर गेडाम,मारोती मडावी, सुरेंद्र पावडे, रोशन कोडापे,सुरज दळांजे,चंद्रभान अलाम,मयुर मेकाले, सुधाकर कव्वलवार, दिवाकर गेडाम, सांवत पेंदोर,अनिल गेडाम,अमोल मडावी आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री पद्माकर गेडाम यांनी केले तर आभार मारोती मडावी यांनी मानले
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here