लोकदर्शन मुबई 👉शुभम पेडामकर
सलाम बॉम्बे फाऊंडेशन ही विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते. गेल्या २० वर्षांपासून मुंबईतील महापालिका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलात्मक व गुणात्मक विकासासाठी प्रिव्हेंटीव हेल्थ प्रोग्राम, खेळ, कला, व्यावसायिक कौशल्य विकास आणि मीडिया अकादमी असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. संस्थेच्या ‘A CHILD IN SCHOOL HAS A FUTURE’ या ब्रीद नुसार सलाम मुंबई मीडिया अकादमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे.
मीडिया अकादमीव्दारे इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य, संवाद कौशल्य, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, क्रिएटिव्ह रायटींग अशा कौशल्यांचे प्रशिक्षण, ह्या क्षेत्रामधिल करियरची ओळख व मार्गदर्शन दिले जाते. सदर प्रशिक्षणातून विकसीत झालेल्या कौशल्यांना सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येते. फोटोग्राफी क्षेत्रातील नामवंत मास्टर फोटोग्राफर्स विद्यार्थ्यांना विविध सत्रांद्वारे मार्गदर्शन करून व विद्यार्थ्यांनी विविध छायाचित्रांचे प्रकल्प केले आहेत. ते राहत असलेल्या वस्त्यांमध्ये त्यांच्याशी निगडीत विषयाला अनुसरून त्यांनी काढलेली उत्तम छायाचित्रे इतर विद्यार्थ्यांसाठी व प्रेक्षकांसाठी प्रदर्शनामार्फत सादर करणार आहेत.
मुंबई सुमारे १.८४ करोड लोकांची वैविध्यपूर्ण जीवनशैली असून सर्वांचे पालनपोषण करते. मुंबई हि सर्व प्रकारच्या लोकांसाठी स्वप्ननगरी आहे. परंतु याठिकाणी सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतील असे नाही. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे इथल्या लोकांना विविध उत्पन्न स्तरावरील मिळणारी संधी. सुमारे ६५% लोकसंख्या वस्त्यांमध्ये राहत असल्याने त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठीची पुरेशी संसाधने उपलब्ध नाहीत. ते या मल्टिव्हर्सचा एक भाग आहे. या फोटोग्राफी प्रदर्शनाच्या माध्यमातून सलाम बॉम्बे मीडिया अकादमीच्या विद्यार्थ्यांनी मुंबईचे विविध चित्र दाखवण्यासाठी त्यांच्या लेन्सद्वारे हे सार टिपले आहे.
बालदिनाचे औचित्य साधून ‘मल्टीवर्स ऑफ मुंबई (बहुरूपी मुंबई)’ या विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक १४/११/२०२२, सोमवार, सकाळी ११ ते संध्याकाळी ६ रोजी कोरम क्लब ८ वा मजला, टॉवर 2A, वन वर्ल्ड सेंटर, लोअर परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. ह्या प्रदर्शनाला वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी, मीडिया कॉलेजचे विद्यार्थी, नामांकित छायाचित्रकार तसेच वेगवेगळ्या माध्यमांचे प्रतिनिधि उपस्थिती दर्शविणार आहेत.
८१०८३६९३७१ या संपर्क क्रमांकावर सकाळी ११ ते सायं ०६ पर्यंत संपर्क साधा अथवा amruta.shinde@salaambombay.org या मेल आय.डी वर आपली तपशीलवार माहिती पाठवून द्या.
शुभम पेडामकर