चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील वनक्षेत्रात कृषी पंपांना सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात होणार वीज पुरवठा* *♦️मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मा.उपमुख्‍यमंत्र्यांना केलेली विनंती मान्य.* *♦️लवकरच होणार आदेश निर्गमित.*

 

लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर

मानव-वन्‍यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्‍ल्‍यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते सायं. ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यासंदर्भात राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याशी सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चा केली आहे, उपमुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी तात्काळ सकारात्‍मक कार्यवाहीचे निर्देश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

या जिल्ह्यांमध्ये दुपारच्‍या वेळी कृषी पंपांसाठी विज भारनियमन करण्‍यात येत असल्‍यामुळे रात्रीच्‍या वेळी शेतकरी संबंधित कामांसाठी शेतात जातात. अशा वेळी वन्‍यप्राण्‍यांच्‍या होणा-या हल्‍ल्‍यात शेतक-यांचे बळी जाण्‍याचा घटना जिल्‍हयात मोठया प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे सद्या रात्रीच्या वेळी शेतीची कामे करण्यास शेतकरी वर्ग धास्तावलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांना भेटून विनंती केली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता चंद्रपूर व गोंदिया जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्‍यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्‍यांना दिवसा कृषी पंपांना विज पुरवठा करण्‍याची विनंती केली व त्‍यांनी सुध्‍दा ती तात्‍काळ मान्‍य केली. याबाबतचे आदेश लवकरच निर्गमित होणार असून या माध्‍यमातुन चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्‍हयातील शेतकरी, शेतमजूर बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *