श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी)तर्फे श्री साई मंदिर उरण (बोरी) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा.

लोकदर्शन उरण👉१०विठ्ठल ममताबादे

उरण दि १० नोव्हेंबर 2022 श्रद्धा सबुरी पदयात्रा मंडळ उरण (बोरी)तर्फे श्री साई मंदिर उरण (बोरी) ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा सोहळ्याला दिनांक ९/११/२०२२ रोजी उरण मधून सुरवात झाली.पदयात्रेचा कालावधी बुधवार दि. ०९ नोव्हेंबर २०२२ ते गुरुवार दि. १७ नोव्हेंबर २०२२ असा आहे.मयुरेश पनिकर, हरिराम शर्मा (बाळू), सुयोग ठाकूर, रोहन पारधी, राजेश पुरव, सिध्दार्थ म्हात्रे, सिध्दार्थ सुर्वे, जयेश म्हात्रे, हंसराज चव्हाण, प्रशांत शिर्धनकर, प्रलय तारेकर, ओमकार राऊत, मयुरेश पाटील, विशाल जाधव, भुषण पाटील, योगेश म्हात्रे, चेतन माळी, गणेश तांडेल, रोहन गायकवाड,धनंजय भोरे,दिपक थळी, सुरेश अय्यर, आकाश जाधव आदी पदयात्री या पालखी पदयात्रा सोहळ्यात सहभागी झाले आहेत.ॐ श्री साईनाथाय नमः या मंत्राचा जप करत सर्व भाविक भक्त श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचतात व श्री साईबाबांचे दर्शन घेऊन मोठ्या आनंदाने घरी परततात.दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या भक्ती भावाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here