गडचांदूर येथे गुरुनानक जयंती साजरी

लोकदर्शन 👉.मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुद्वारा साध संगत, गडचांदूर येथे जगतगुरु श्री गुरुनानक देव यांची 553 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने महान कीर्तन दरबार चे आयोजन करण्यात आले होते.
नांदेड येथील भाई साहेब भाई श्यामसिंग जी रागी जतथा हजूर साहेब यांनी सुमधूर आवाजात कीर्तनसादर केले.
यावेळी रहरास साहेब पाठ ,गुरवानी कीर्तन ,अरदास, गुरु का लंगर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याचा 1200 भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमात गुरुद्वारा चे संस्थापक परमिंदर सिंग सचदेव, गुरप्रितसिंग सचदेव,गोपालसिंग सचदेव, हंसराज चौधरी, राकेश अरोरा,सोनू झाम, ओंकार सिंग,इंदर सिंग,मुकत्यारसिंग,मंजिंदर सिंग,धनजोतसिंग,टीकाराम चिवाने,मूलचंदानी, प्रेमसिंग,तसेच इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here