अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहतीत वाघाचा* *वावर.* ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, कामगारांमध्ये दहशत ,,,,,,,,,,,,,,, *नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन*

*अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहतीत वाघाचा* *वावर.

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
*गडचांदूर :-*

जिल्हात सर्वत्र वाघाची हाहाकार ऐकायला येत असताना आता आवारपुर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वसाहतीत वाघाचा वावर असल्याचे निदर्शनास आले असून अनेकांना दर्शन झाल्याचे बोलले जात आहे.

वसाहत परिसरात मोठया प्रमाणावर झाडे आणि झुडपी सारखे जंगल असल्याने इतर प्राण्याचा वावर असतो शिकारीचा शोधात वसाहतीत वाघ घुसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वाघ म्हटल्यावर अनेकांना घाम सुटते परंतू कंपनी वसाहतीत मागील दोन दिवसा पासून वाघाचा वावर असल्याची चर्चा कामगारा मध्ये सुरू आहे. कंपनी प्रशासन ने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहेत,

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी वसाहत अतिशय सुरक्षित व कडक नियम लावून याचे पालन केल्या जाते तसेच विवीध ठिकाणी सि सी टी व्ही कॅमेरे सुध्दा लावण्यात आले आहे. परंतू मागील दोन दिवसा पासून अनेकांना दर्शन झालेल्या वाघ या सि सी टी व्ही कॅमेरे मध्ये आला नाही का. की लावाण्यात आलेले सि सी टी व्ही कॅमेरे हे कुचकामी ठरत असून देखावा आहे का असा प्रश्न आता कामगारांना पडू लागला आहे.

अल्ट्राटेक वसाहत ही झाडा झुडपाणी वेढली आहे. इथे नेहमीच ठडवा व शिकार मिळत असल्याने या पूर्वी देखील वसाहतीत वाघांनी मुक्काम ठोकला होता हे विशेष
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरात वाघाचा वावर आमचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला आहे .आम्ही वाघाच्या हालचालीवर नजर ठेऊन आहोत .नागरिकांनी सावधगिरी बाळगावी .
*अरुणा चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी* *वनसडी )*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here