*मा. आदित्य साहेब ठाकरे युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते यांचे सोलापूर नगरीत आगमन व शिवसेनेतर्फे भव्य स्वागत :- पुरुषोत्तम बरडे.*

 

*लोकदर्शन सोलापूर👉.मोहन भारती

दिनांक ०७/११/२०२२ :-* मा. आदित्य साहेब ठाकरे यांचे सोलापूर नगरीत आगमन होणार तसेच त्यांच्या समवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ उपस्थित राहतील तरी मंगळवार दि. ८-११-२०२२ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वा. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला आघाडी, युवासेना, युवती सेना, विद्यार्थी सेना, कामगार सेना, वाहतूक सेना तसेच शिवसेना प्रणित संघटनानी हॉटेल बालाजी सरोवर येथे स्वागत व सत्कार करण्यासाठी उपस्थित रहावे.
सांगोला येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी बुधवार दि.९-११-२०२२ रोजी सकाळी ठीक ८:०० वा. मार्गस्थ होतील.
तरी बुधवार दि.९-११-२०२२ रोजी सकाळी ठीक ८:०० वा.हॉटेल बालाजी सरोवरच्या प्रवेशद्वार येथे शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महिला आघाडी, युवासेना, युवती सेना, विद्यार्थी सेना, कामगार सेना, वाहतूक सेना तसेच शिवसेना प्रणित संघटनानी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे. असे आव्हान जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब व शहरप्रमुख विष्णु महाराज कारमपुरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here