लोकदर्शन घणसोली 👉-गुरुनाथ तिरपणकर
सालाबादप्रमाणे याही वर्षी आदर्श सोसायटी घरोंदा घणसोली मध्ये विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात भक्ती भावाने कार्तिकी एकादशीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला , यावेळी सकाळी ६ वाजता विठ्ठल – रुक्मिणी अभिषेक करून आरती घेण्यात आली , त्यानंतर घणसोली मधील ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्थे तर्फे घणसोली सेक्टर – १६ साईबाबा मंदिर ते आदर्श सोसायटी विठ्ठल – रुक्मिणी मंदिर हरिनाम दिंडीचे आयोजन करण्यात आले होते , सदर दिंडी मध्ये साधारण ८० ते १०० ज्येष्ठ नागरिकांनी हरिनामाचा जयघोष करत सहभाग घेतला होता असे ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष भास्कर आव्हाड यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी दिवसभर विठ्ठल भक्तांनी मंदिरामध्ये येवून विठू माउली चे दर्शन घेतले त्यावेळी सर्वांना केळी व राजगिराचे लाडू प्रसाद म्हणून वाटण्यात आले असल्याचे आदर्श सोसायटी चे अध्यक्ष अजय चव्हाण यांनी सांगितले , सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सवा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , त्यानंतर ७ वाजता महाआरती व सायंकाळी ८ वाजता सुस्वर भजनाच्या कार्यक्रमा नंतर अत्यंत भक्तीमय वातावरणात कार्तिकी एकादशी चा कार्यक्रम संपन्न झाला असल्याचे मत आदर्श सोसायटीचे सचिव हरिसिंग रावत आणि खजिनदार चंद्रशेखर करंडे यांनी व्यक्त केले.
कार्तिकी एकादशी चा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी आदर्श सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय कुंभार आणि रघुनाथ काते यांच्या सह आदर्श सोसायटी मधील संचालक मंडळ आणि रहिवाशी यांनी मेहनत घेतली.