लोकदर्शन बदलापूर👉-गुरुनाथ तिरपणकर)
-तुळशीची लग्न अजुन व्हायच आहेत.दिवाळीचे महत्वाचे दिवस संपले तरी,दिवाळी कशी गेली याची चर्चा सर्वत्र सुरुच आहे.दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर सर्वच सण उत्साहाने साजरे झाले.दिवाळीही उत्साहात साजरी झाली.त्यामुळे ब-याच मंडळांनी,सोसाट्यांनी महाराष्ट्रातील गड किल्यांची प्रतिकृती उभारून त्याची माहिती व्हावी म्हणून ब-याच ठिकाणी कील्ले उभारण्यात आले.त्याच अनुषंगाने क्रीष्णानगर,आपटेवाडी,बदलापूर येथील भागिरथी विश्व सोसायटीने भागिरथी विश्व मित्र मंडळाच्या सोसायटीच्या प्रागंणात दापोली येथील हर्णे बंदराजवळील “सुवर्णदुर्ग”कील्लाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सुवर्णदुर्ग किल्याला संरक्षण म्हणून कनकदुर्ग,फत्तेगड,गोवाड गड हे छोटे कील्ले ही उभारण्यात आले होते.याप्रसंगी शिल्पा भुतकर यांनी सुवर्णदुर्ग किल्याची माहिती दीली. तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नरसाळे यांनीही इतर इतर किल्यांची माहिती कथन केली.सुवर्णदुर्ग किल्या साकार करण्यासाठी अनुज मोरे,प्रथमेश शिर्के,रुपेश मोरे,सुरेंद्र मारल,अदिती मोरे,रिया धुपकर,अथर्व राऊत,प्रशांत मोरे,गौरव जाधव,संतोष गाडे,मोहीत कुळकर्णी,पीयुष गाडे,मल्हार कदम,अथर्व,मयांक असरोंडकर,योगेश सोनावणे,विनय करंजवकर,सोहम खामकर आणि भागिरथी विश्व सोसायटीतील इतर तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. गेली अनेक वर्षे भागिरथी विश्व सोसायटी कील्ले उभे करुन गड-किल्यांविषयी जनजागृती करत आहे.त्यांना प्रथम क्रमांकाची बरीच पारितोषिके मिळालेली आहेत.ब-याच मान्यवरांनी सुवर्णदुर्ग किल्याला भेट देऊन कौतुक व अभिनंदन केले आहे.