लोकदर्शन*सोलापूर 👉 मोहन भारती .
दिनांक :- ०१/११/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट् कामगार सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन उद्या दि. ०२/११/२०२२ बुधवार रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत ३ सत्रात कामगार सेना कार्यालयात होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेची पंचवार्षिक राज्यव्यापी अधिवेशन दि. २ नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी होत असुन या अधिवेशनात संपुर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्यातील २ प्रतिनिधी असे ५२ कामगार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वरुप खालील प्रमाणे असुन पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ व कामगार समस्या या विषयावर वक्ते श्रीनिवास चिलवेरी, ॲड. मुनिनाथ कारमपुरी हे मार्गदर्शन करणार आहेत. दुसरा सत्रात सरकारचे लक्ष कामगारांकडे कधी जाणार या विषयावर वक्ते प्रा. श्रीशैल वाघमोडे सर हे मत मांडणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीबाई ईप्पा या राहणार आहेत. तर तिसरा सत्रात आता आम्ही कामगारांसाठीच या विषयावर वक्ते विष्णु कारमपुरी (महाराज) अशा तीन सत्रा नंतर कामगार विरोधी भुमिका घेणारा केंद्र व राज्य शासनाचे विरोधात व आंदोलनाचे काही ठराव पारीत करण्यात येणार आहेत. अशा रुपरेषांनी होणारा महाराष्ट्र कामगार सेनेचा राज्यव्यापी अधिवेशानामध्ये उपस्थित कामगार प्रतिनिधींचे मनोगत या ठिकाणी मांडणार आहे. सर्वाचे सुचना ऐकल्यानंतर प्रत्येक सुचनांचा स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येणार आहे. या संपूर्ण अधिवेशनांचे अध्यक्षस्थानी दशरथ नंदाल भूषविणार आहेत. शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता होणार आहे.